FLY91 to Commence Direct Flights Connecting Goa and Pune, Sindhudurg and Pune

~ Increased direct connectivity between Goa, Sindhudurg and Pune, expected to boost tourism in the region. 

~ Direct flights between Goa-Pune and Pune-Sindhudurg to operate on Saturday and Sunday from August 31. 

~The Sindhudurg-Pune-Sindhudurg connection is particularly noteworthy, as it marks the first time these regions will be directly connected by air. 

FLY91, a pure-play regional airline headquartered in Goa will commence direct flights on the Goa-Pune-Goa and Pune-Sindhudurg-Pune sectors on weekends effective from August 31. 

Two flights will operate on the Goa-Pune-Goa route on Saturday and Sunday, with flight IC1376 (GOX-PNQ) departing the Manohar International Airport (MIA) in Goa at 0635 hrs to arrive at the Pune International Airport at 0740 hrs. Meanwhile, flight IC1375 (PNQ-GOX) will depart from the Pune International Airport at 1055 hrs to arrive at the MIA, Goa, at 1210 hrs. This new route strengthens the airline’s commitment to enhancing regional air connectivity, particularly between key tourism hubs and emerging destinations.

Additionally, for the first time, FLY91 will also commence direct flights connecting Sindhudurg and Pune on weekends effective from August 31, a significant milestone in regional air travel, especially within Maharashtra. FLY91’s flight IC5302 (PNQ-SDW) departs from the Pune International Airport at 0805 hrs and arrives at the Sindhudurg Airport at 0910 hrs, while flight IC5303 (SDW-PNQ) will depart from Sindhudurg Airport at 0930 hrs to arrive at the Pune International Airport at 1035 hrs on Saturday and Sunday. 

The Goa-Pune-Goa route is expected to boost tourism and business travel, offering greater convenience for travellers between these two popular destinations. Goa, famous for its beaches and culture, will now be more accessible to Pune’s residents, boosting leisure travel. The new route also offers travellers from Goa easier access to Pune’s cultural, educational and IT avenues.

FLY91’s new Sindhudurg-Pune-Sindhudurg connection is particularly noteworthy, as it marks the first time these regions have been directly connected by air. Sindhudurg, a picturesque coastal region in Maharashtra, is an emerging destination known for its natural beauty and historical significance. The direct flight will make it easier for tourists to discover Sindhudurg’s beaches, forts, and temples, while also supporting the local economy by bringing in more visitors.

Manoj Chacko, Founder, MD, and CEO of FLY91, commented, “Our goal is to enhance last-mile air connectivity in India and these new routes are a step in that direction. Connecting Goa and Sindhudurg with Pune will not only facilitate travel but also open up new opportunities for tourism and business between these regions. FLY91 is committed to starting daily connectivity between Goa and Pune, subject to availability of slots at the Pune International Airport.”

FLY91 operates out of Manohar International Airport, Mopa, Goa, which serves as its home base. As part of its growth strategy, the airline plans to connect over 50 cities in the next five years, with a focus on tier 2 and tier 3 cities across India.


Marathi

फ्लाय९१ गोवा-पुणे आणि सिंधुदुर्ग-पुणे जोडणारी थेट उड्डाणे सुरु करणार
~पर्यटनाला चालना देण्यास फ्लाय९१ची गोवा, पुणे आणि सिंधुदुर्ग मार्गांवर थेट विमानसेवा.
~ गोवा-पुणे आणि पुणे-सिंधुदुर्ग दरम्यान ३१ ऑगस्टपासून शनिवार आणि रविवारी थेट उड्डाणे सुरू.
~सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग ही विमानसेवा पहिल्यांदाच पुणे आणि सिंधुदुर्गला हवाई मार्गाने जोडणार.
पणजी, ऑगस्ट २०२४: गोवा स्थित विमानसेवा फ्लाय९१ ३१ ऑगस्ट पासून गोवा ते पुणे आणि सिंधुदुर्ग ते पुणे या मार्गांवर थेट विमानसेवा सुरु करणार आहे.

शनिवार आणि रविवार दरम्यान गोवा-पुणे-गोवा मार्गावर दोन विमानसेवा चालवल्या जाणार आहेत. फ्लाईट IC13769 (GOX- PNQ) सकाळी 0635 वाजता गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटेल आणि 0740 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय  विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे, फ्लाइट IC1375 (PNQ-GOX) सकाळी 1055 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  सुटेल आणि 1210 वाजता गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. या नवीन मार्गामुळे प्रमुख  पर्यटन स्थळे आणि उदयोन्मुख गंतव्यस्थानांदरम्यान प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्याच्या एअरलाईनच्या बांधिलकीला  बळकटी  मिळेल. 
३१ ऑगस्टपासून, फ्लाय९१ आठवड्याच्या शेवटी सिंधीदुर्ग आणि पुणे यांना जोडणारी थेट विमानसेवा सुरु करणार आहे. ही  महाराष्ट्रतील प्रादेशिक हवाई प्रवासासाठी एक मोठी गोष्ट आहे. फ्लाईट IC5302 (PNQ-SDW) सकाळी 0805 वाजता पुणे  विमानतळावरून सुटेल आणि 0910 वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचेल. फ्लाईट IC5303 (SDW-PNQ) सकाळी 0930  वाजता सिंधुदुर्ग विमानतळावरून सुटेल आणि 1035 वाजता पुणे विमानतळावर पोहोचेल. हे दोन्ही फ्लाईट्स शनिवार  आणि रविवारी चालणार आहेत.

गोवा-पुणे-गोवा ही विमानसेवा दोनही स्थळांच्या पर्यटनाला चालना देईल. गोव्यातील सांस्कृतिक स्थळांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर  पुणेकरांना भेट देणे आता सोपे होईल आणि गोव्यातील प्रवासी पुण्याच्या सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाच्या  ठिकाणी त्वरित पोहोचू शकतात. फ्लाय९१ची नवीन सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमानसेवा उल्लेखनीय आहे, कारण हे क्षेत्र पहिल्यांदाच  थेट हवाई मार्गाने जोडले गेले आहे. हे पर्यटकांना सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे, किल्ले आणि मंदिरे अनुभवण्यास आणि  स्थानिक तेथील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत करेल.

“आमचे ध्येय भारतातील शेवटच्या नाईलची हवाई कनेक्टिव्हिटी वाढवणे आहे आणि हे नवीन मार्ग त्या दिशेने एक पाऊल आहेत.  गोवा आणि सिंधुदुर्ग यांना पुण्याशी जोडल्याने केवळ प्रवासच सुकर होणार नाही तर या प्रदेशांमधील पर्यटन आणि व्यवसायाच्या  नव्या संधीही उपलब्ध होतील.फ्लाय९१ गोवा आणि पुणे दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे.” असे  फ्लाय९१ संस्थापक, एमडी आणि सीइओ मनोज चाको म्हणाले.